क्राईम

विजेचा शॉक : एक विद्यार्थीनी, वृद्धासह 3 कुत्र्यांचा मृत्यू

जनावरे चारत असताना विजेच्या तुटलेल्या तारांमुळे विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाल्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तीन कुत्र्यांनाही जीव गमवावा लागला.

विजेच्या तुटलेल्या धक्क्याच्या संपर्कात आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळुर जवळील गुरुपुरा येथे ही घटना घडली. अश्मी शेट्टी (वय 19) असे मृत विद्यार्थीणीचे नाव आहे.

मंगळुरू येथील एका खासगी महाविद्यालयात सीएचे शिक्षण घेत असलेली शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीनी अश्मी शेट्टी ही जनावरे चारण्यासाठी शेतात येथे गेली होती. शेतात तुटलेल्या विजेच्या तारांचा फटका बसल्याने अश्मी ला मंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

अश्मीसोबत असलेल्या तीन कुत्र्यांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. सबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक संतप्त झाले आहेत. बाजपे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

तसेच चित्रदुर्ग जिल्ह्यात म्हशी चारताना विजेच्या तुटलेल्या तारांमुळे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. शिवलिंगय्या वय 70 असे मृताचे नाव आहे.

या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते