कन्नडसक्ती विरोधात युवा समितीकडून आमदार हलगेकर यांना आज निवेदन
खानापूर, ४ ऑगस्ट २०२५ – सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या कन्नडसक्तीच्या वाढत्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने आवाज उठविला आहे. या पार्श्वभूमीवर आज सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता खानापूरचे आमदार मा. विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्यात येणार आहे.
यासाठी बेळगाव येथून जाणाऱ्या मराठी भाषिकांनी आज सकाळी १०.३० वाजता मराठी मंदिर कार्यालय येथे जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर एकत्रितपणे खानापूरकडे रवाना होऊन निवेदन दिले जाणार आहे.
खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक नागरिकांनीही शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, खानापूर येथे ठिक ११ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठी अस्मिता आणि सीमाभागातील हक्कांसाठी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने दिला जाणारा हा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.