71 दिवसांनंतर बेपत्ता झालेला ट्रक आणि चालक अर्जुनचा मृतदेह सापडला
उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरूर दरड कोसळलेल्या अपघातात बेपत्ता झालेल्या केरळमधील ट्रकचालक अर्जुन चा मृतदेह सापडला आहे. तीन महिन्यांनंतर ट्रकचे अवशेष आणि मृतदेह सापडला.
कारवार : उत्तर कन्नड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर 16 जुलै रोजी दरड कोसळून भीषण अपघात झाला होता. यामध्ये बेपत्ता झालेल्या केरळमधील ट्रकचालक अर्जुनचा मृतदेह 71 दिवसानंतर आज सापडला आहे. अर्जुनचा मृतदेह लॉरीमध्ये सापडला. अर्जुनच्या मृतदेहाचे दोन तुकडे पडले होते. अर्जुनचा मृतदेह लॉरीमध्ये सापडल्याने भूस्खलनाची तीव्रता लक्षात येते. या घटनेतील आणखी दोन बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.
यावेळी शिरूरमध्ये भावनिक क्षण पाहायला मिळाले. अर्जुनची बहीण पती जितिन यांचे अश्रू अनावर झाले. “आम्हाला माहित होते की अर्जुन परत येणार नाही, परंतु आम्हाला आशा होती की आम्हाला त्याचा काही अंश सापडेल,”असे जितिन ने माध्यमांना सांगितले. लॉरीच्या केबिनमध्ये मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला आमदारांनी दुजोरा दिला. मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अर्जुन 16 जुलै रोजी बेपत्ता झाला होता. त्या दिवशी सकाळी पावणेआठ वाजता शिरूर येथे दरड कोसळलीहोती. 23 जुलै रोजी रडार आणि सोनार सिग्नलवर लॉरी असल्याचा संशय असलेल्या धातूच्या भागाचे सिग्नल होते. नदीच्या मधोमध असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ सीपी ४ चिन्हांकित करण्यात आले होते. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 28 जुलै रोजी शोधमोहीम थांबवण्यात आली होती. शोधमोहिमेचा दुसरा टप्पा 14 ऑगस्टपासून सुरू केला होता. त्यांनतर 17 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शोधमोहीम सुरू राहू शकली नाही. केरळमधून ड्रेजर आणण्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. ईश्वर मालपे यांच्यासह अनेक जण शोधमोहिमेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सहभागी झाले होते. परंतु नदीच्या तळाशी झाडे आणि खडक अडकले होते आणि पूर वाढल्याने ते खोलवर जाऊ शकले नाहीत. पण आज या प्रयत्नांना यश आले असून अर्जुनचा मृतदेह सापडला आहे.
Shirur landslide: Body of missing driver Arjun found
shirur driver dead body found in River
lorry driver arjun
karwar: shirur land slide truck driver found