Finance

चापगाव येथील त्या कुटुंबाला डॉ. अंजलीताई फाऊंडेशनची मदत

खानापूर: चार दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत चापगाव Chapgaon येथील यल्लाप्पा मादार यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्या घरची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. अंजलीताई फाऊंडेशन तर्फे रविवारी (दि. २३) त्यांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने घराचे संपूर्ण छत व जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मुसळधार पावसात घराचे छप्पर कोसळल्याने मादार कुटुंबाला त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेत माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर Dr. Anjali Nimbalkar यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईसाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

Dr. Anjalitai Foundation Khanapur

Dr. Anjalitai Foundation Khanapur

तसेच डॉ. अंजलीताई फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रविवारी चापगाव Chapgaon khanapur येथे जाऊन दहा हजारची मदत केली. डॉ. अंजलीताई फाऊंडेशनचे सामाजिक कार्य कायम सुरूच राहणार आहे. यात खंड पडू दिला जाणार नाही असे संचालक सुरेश जाधव यांनी सांगितले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, अॅड.आय.आर.घाडी, भूषण पाटील, गुडू टेकडी, इसाक पठाण, ग्रामपंचायत सदस्य नागराज येळूरकर, राजेश पाटील आदी उपस्थित होते.

dr Anjalitai Foundation help to poor family

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते