खानापूर: काँगेसने खानापूर तालुक्यातील माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना तिकिट दील्याने खानापूर तालुक्यात भाजपपेक्षा कॉंग्रेसचा जोर अधिक दिसत आहे. मागील खासदारांचा इतिहास पाहून तसेच भाजपने आपल्या तालुक्यात उमेदवारी न दिल्याने अनेक भाजप कार्यकर्ते व जनता डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी उभी आहे.
खानापूर तालुक्यात विकास करणार
सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी वाढत चालली असून भाजपपेक्षा कॉंग्रेसचा प्रचार तालुक्याच्या जोर धरून आहे. तेव्हा आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याप्रमाणे खानापूर तालुक्यात भाजपच्या लोकसभा उमेदवाराला मतदान मिळवणे कठीण दिसत आहे. तर दुसरीकडे खानापूर तालुक्याील माझी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होणार याचा विश्वास आहे.
मागील 30 वर्षात भाजपच्या खासदारांनी तालुक्याकडे केलेला कानाडोळा व विकासाकडे केलेले दुर्लक्ष याचे उत्तर खानापुरचे पदाधिकारी देऊ शकत नाहीत. फक्त मोदी यांच्या नावावर मते मागितल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मागील विकासाचे उत्तर नाही त्यामुळे इतिहासात खानापूर तालुक्यात मिळालेली पहिलीच उमेदवारी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या स्वरूपात तालुक्यात मिळाली आहे. आपल्या समाजाला उमेदवारी मिळाली आहे. यासाठी सर्वांनी पक्षीय राजकारण दूर ठेवून तालुक्यातील समस्यांचां अनुभव असलेल्या गावोगावी परिचय असलेल्या आणि याआधी तालुक्याची विकास कामे केलेल्या एका धडाडीच्या नेतृत्वाला आपण सर्वांनी साथ द्यावी असे आव्हाहन डॉ. अंजली निंबाळकर यांनी नुकताच पार पडलेल्या सभेत केले.