बेळगाव

मलप्रभा नदी काठावर मगर, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा ईशारा

बेळगांव: कणकुंबी व खानापूर वनक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मलप्रभा नदी दिवसेंदिवस ओसंडून वाहत आहे.

वाहत्या मलप्रभा नदीच्या पाण्यात बैलहोंगल येथील मातोली, मल्लूर आणि होसूर या गावांमध्ये मलप्रभा नदीच्या काठावर शनिवारी मोठ्या मगरींचे दर्शन झाले. 

या अचानक बाहेर पडत असलेल्या मगरींमुळे नदीकाठचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे मगर पूर्ण नदी काठावर असू शकतात त्यामुळे नदीकाठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आदेश आले आहेत.

मगरी नदीच्या काठावर विश्रांती घेऊन पुन्हा नदीत घसरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नदीपात्रात सापडलेल्या मगरींना तात्काळ पकडून पुढील अनर्थ टाळावा, असे आवाहन मलप्रभा नदी काठचे शेतकरी करत आहेत.

बैलहोंगल उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी मलप्रभा नदीकाच्या सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

crocodile in malapraba river

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते