खानापूर

घरात सापडले गव्याचे मांस, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल

खानापूर :  तालुक्यातील जांबेगाळी गावातील एका घरावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्रीलायक माहितीच्या आधारे गुरुवारी छापा टाकून घरामध्ये बेकायदेशीररीत्या साठवलेले वन्यप्राण्याचे मांस व हरणाचे शिंग जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

जांबेगाळी गावातील महमद अली हलसीकर वमौलाली हलसीकर यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांकडून गव्याचे मांस आणि हरणाचे शिंग जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्ती, शिकारीचे साहित्य आणि छाप्यामध्ये सापडलेल्या वस्तू न्यायालयीन कोठडीत देण्यात आल्या असून नागरगाळी उपवन अधिकारी कार्यालयात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते