खानापूर
तहसीलदार कार्यालयात कारकूनाची आत्महत्या; बेळगाव शहरात खळबळ
बेळगाव: शहरातील तहसीलदार कार्यालयात उपविभागीय कारकूनाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रुद्रेश येडवण्णावर (वय ३५), हे तहसीलदार कक्षात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
तहसीलदार कार्यालयात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली, आणि त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे बेळगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच खडे बाजार पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
या सदर घटनेमुळे बेळगाव तहसीलदार मात्र कचाट्यात सापडले आहेत.
Clerk commits suicide at tehsildar’s office; Panic in Belgaum city