खानापूर
कर्नाटक-गोवा सीमेवरील चोर्ला गावातील स्वयंभू रामेश्वर मंदिरात सूर्याभिषेकाचा अनोखा चमत्कार!
खानापूर: कर्नाटक-गोवा सीमेवरील निसर्गरम्य चोर्ला गावात वसलेले श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर हे भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराची खासियत म्हणजे वर्षातून दोन वेळा सूर्यदेव आपल्या किरणांनी थेट शिवलिंगाचा अभिषेक करतात.

हे प्राचीन मंदिर आजही जसेच्या तसे आहे. प्राचिन बांधकाम, खगोल शास्त्राचा वापर करून बांधलेल्या या पुरातन मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर असलेल्या एका विशेष छिद्रातून शिवरात्रीच्या काळात सूर्यकिरण शिवलिंगावर पडतात आणि एक अद्भुत व अविस्मरणीय दृश्य तयार होते. हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी आणि महादेवाची कृपा अनुभवण्यासाठी हजारो भाविक येथे भेट देतात.
दररोज येथे शिवलिंगाचा दुग्ध व जलाभिषेक होतो. मात्र, सूर्याभिषेक हा एक दैवी चमत्कार वाटावा असा अनुभव असतो. दरवर्षी प्रमाणे ही घटना पाहण्यासाठी यंदाही अनेक भाविकांनी इथे गर्दी केली आहे.

