खानापूर
चोर्ला घाटात दरड कोसळली; सिमेंटचा ट्रक दरीत
खानापूर: चोर्ला घाटात काल सोमवारी (ता. १४) मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आज मंगळवारी (ता. १५) सकाळी घाटात दरड कोसळली. यामुळे काही काळ चोर्ला महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरड कोसळल्याच्या ठिकाणीच सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक दरीत उलटला. सुदैवाने ट्रकचालक बचावला असला तरी ट्रक व सिमेंटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरड बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. मात्र, पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.