खानापूर
चिखले धबधबा पर्यटकांसाठी पुन्हा खुला, मात्र सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
चिखले(प्रतिनिधी): तालुक्यातील प्रसिद्ध चिखले धबधबा पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला असून, आता या ठिकाणी प्रवेश शुल्क आकारले जात आहे. प्रौढांसाठी प्रवेश शुल्क 60, तर मुलांसाठी ₹30 इतके ठेवण्यात आले आहे.
तसेच वाहन पार्किंगसाठी शुल्क आकारले जात असून, दुचाकींसाठी ₹४०, चारचाकींसाठी ₹६० आणि बससाठी ₹१०० इतके शुल्क आहे. कॅमेरा वापरण्यासाठी ₹५० अतिरिक्त शुल्क आकारले जाते. हे सर्व शुल्क स्थानिक वन समितीमार्फत गोळा करण्यात येते.
मात्र, धबधब्याजवळ योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने आणि कोणतीही निगराणी न ठेवता पर्यटक उभे राहत असल्यामुळे सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक पर्यटक धबधब्याच्या टोकाजवळ उभे राहून धोकादायक सेल्फी काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.