खानापूर अर्बन बँकजवळ विद्युत स्पर्शाने गाभण म्हैस ठार
खानापूर: शहरातील अर्बन बँकच्या मागील अंगणातील हिरव्या गवतात चरत असलेली म्हैस विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार निंगापूर गल्लीतील शेतकरी निलेश सडेकर यांच्या मालकीची पंढरपूर जातीची गाभण म्हैस त्यांच्या मुलाने चरायला सोडली होती. चरत असताना म्हैस अर्थींग वायर जवळ गेली असता तिला जोराचा धक्का बसला आणि म्हैस तिथेच पडली.
ही परिस्थिती लक्षात येताच तो मुलगा म्हशीजवळ गेला नाही. मुलाने या घटनेची माहिती तात्काळ वडील नीलेश सडेकर यांना दिली. सडेकर यानी यांनी घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा खंडित करून म्हशीला बाहेर काढले.
या तारे जवळ मुतारी असल्याने अनेक जण तिथे ये जा करत असतात. तरी चुकून या तारेला कोणी स्पर्श केला नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सडेकर कुटुंबीयांनी मृत म्हशीची विधिवत पूजा करून शेतात खड्डा खोदून दफन केले.
सडेकर कुटुंबीयांनी अर्बन बॅकेचे व्यवस्थापक नंदकुमार खटोरे याच्याशी भेटून नुकसान भरपाईची मागणी केली.
यावेळी नंदकुमार खटोरे यानी बॅक संचालकाच्या बैठकीत ठराव मांडुन आदेशानुसार नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. गाभण म्हैशीची मृत्यू झाल्याने नागरीकांतुन हळहळळ व्यक्त होत होती.