खानापूर

धमाकेदार!!! बी एस एन एल(BSNL) ची पैसे बचत ऑफर..

जियो आणि एअरटेल ने आपले रिचार्ज दर वाडविल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे म्हणूनच पर्याय म्हणून टाटा आणि बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी अनेक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणले आहेत, ज्यात एक्सटेंडेड व्हॅलिडिटी, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि परवडणाऱ्या डेटा ऑप्शनसारखे फायदे देण्यात आले आहेत. खासगी कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती जास्त असल्याने जुलैमध्ये अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. सरकारी टेलिकॉम कंपनी देशभरातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये 4 जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे, अनेक राज्यांमध्ये 4 जी आधीच कार्यरत आहे. बीएसएनएल अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससह डेटा देणारे अनेक परवडणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करते.


उल्लेखनीय योजनांपैकी एक म्हणजे 997 रुपयांचा रिचार्ज प्लॅन, जो वापरकर्त्यांना 160 दिवसांची वैधता आणि एकूण 320 जीबी डेटा प्रदान करतो. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी हायस्पीड डेटा आणि १०० फ्री एसएमएस मिळतात. याव्यतिरिक्त, वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात आणि देशभरात विनामूल्य रोमिंगचा लाभ घेऊ शकतात. या प्लानमध्ये हार्डी गेम्स, झिंग म्युझिक आणि बीएसएनएल ट्यून्स सारख्या विविध मूल्यवर्धित सेवा देखील देण्यात आल्या आहेत.

या नविन ऑफर चा फायदा हा आणेक सामान्य जनतेला होणार असून मोठ्या प्रमाणात सामान्य वर्ग हा BSNL कडे वळताना दिसत आहे.

New BSNL Offers 2024

BSNL offers

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते