खानापूर

ट्रॅकवर झाड, वीजतारा तुटलेला – काही सेकंदांचा उशीर झाला असता तर…!

लोंढा: दक्षिण पश्चिम रेल्वेच्या लोंडा-वास्को मार्गावर एक गंभीर घटना आज पहाटे टळली. रात्री गस्त घालून परतत असताना, एका रेल्वे कर्मचाऱ्याला अचानक मागून मोठा आवाज ऐकू आला. आवाजाचे कारण शोधण्यासाठी तो परत गेला असता, त्याला दिसले की एक झाड रेल्वे ट्रॅकवर पडले होते आणि ते झाड वीज वाहिनीवरही कोसळले होते. त्या वीज वाहिनीचा खांबही तुटून पडलेला होता. त्यामुळे रेल्वे वाहतुकीसाठी मोठा धोका निर्माण झाला होता.

दरम्यान, गोव्याहून कर्नाटकाशी येणारी एक मालवाहतूक रेल्वे त्या मार्गावरून येत असल्याची माहिती या कर्मचाऱ्याला होती. अपघात होण्याची शक्यता लक्षात घेत, तो कर्मचारी सुमारे 1 किलोमीटर अंतर पळत जाऊन केसरलॉकच्या दिशेने येणारी मालगाडी अडवण्यात यशस्वी ठरला. त्याच्या या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला.

मात्र, रेल्वे अडवण्यासाठी पळत असताना रेल्वे ट्रॅकवर पडल्याने या कर्मचाऱ्याचे दोन दात मोडले आणि तो जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून रामनगर येथील सरकारी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या धाडसी कर्मचाऱ्याचे नाव ओम प्रकाश असे आहे.


ಲೊಂಡಾ-ವಾಸ್ಕೋ ರೈಲು ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಪಟ್ರೋಲಿಂಗ್ ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ಹಿಂದಿರುಗುತ್ತಿದ್ದ ರೈಲು ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ ದೊಡ್ಡ ಶಬ್ದ ಕೇಳಿಬಂದಿತು. ಹೋಗಿ ನೋಡಿದಾಗ, ರೈಲು ಹಳೆಯ ಮೇಲೆ ಮರ ಬಿದ್ದಿದ್ದು, ವಿದ್ಯುತ್ ತಂತಿಯು ಕೂಡ ತುಂಡಾಗಿತ್ತು. ಈ ವೇಳೆ ಗೋವಾದಿಂದ ಕರ್ನಾಟಕದತ್ತ ಬರುವ ಮಾಲ್ಗಾಡಿ ಬರುತ್ತಿರುವ ಮಾಹಿತಿ ಇದ್ದು, ಈ ಸಿಬ್ಬಂದಿ ಪ್ರಾಣಾಪಾಯವಿರುವುದು ಅರಿತು 1 ಕಿ.ಮೀ ಓಡಿ ರೈಲನ್ನು ತಡೆದರು. ಅವರು ಓಡುವಾಗ ಬಿದ್ದು ಗಾಯಗೊಂಡು 2 ಹಲ್ಲು ಮುರಿದಿವೆ. ಅವರನ್ನು ರಾಮನಗರ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಸಿಬ್ಬಂದಿಯ ಧೈರ್ಯದದಿಂದ ದೊಡ್ಡ ಅಪಘಾತವೊಂದು ತಪ್ಪಿದೆ. ಅವರ ಹೆಸರು ಓಂ ಪ್ರಕಾಶ್ ಎಂದು ತಿಳಿದುಬಂದಿದೆ.



On the Londa-Vasco railway route, a railway staff member heard a loud noise while returning from night patrol. On checking, he found a tree had fallen on the track and broken an electric line. Knowing a freight train was approaching from Goa, he ran about 1 km and managed to stop the train in time, preventing a major accident. He got injured while running and lost two teeth. He has been admitted to the Ramnagar government hospital. His alertness and bravery averted a disaster. The employee has been identified as Om Prakash.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या