खानापूर

हलगा ग्रामपंचायत अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर!

खानापूर : हलगा (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत अध्यक्षा विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अविश्वास ठराव पारित होणार की नाही याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे.


हलगा ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे तसेच विकास कामे करताना पंचायत सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही असे कारण देत हलगा पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात सदस्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता. माझं अविश्वास ठराव विरोधात पाटील यांनी याचिका दाखल केली होती त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर सदस्यांनी पुन्हा एकदा प्रांताधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर पाटील यांनी अविश्वासाविरोधात पुन्हा याचिका दाखल केली होती मात्र त्यांची याचिका रद्द करण्यात आली होती. त्यामुळे एक मार्च रोजी अविश्वास ठराव विरोधात मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच अविश्वास ठराव पास होणार की नाही याबाबतची उत्सुकता पंचायत क्षेत्रातील गावांमध्ये लागून राहिले होते.


प्रांताधिकारी श्रवणकुमार पंचायतीत दाखल झाल्यानंतर अविश्वासाविरोधातील प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यावेळी
रणजीत कल्लाप्पा पाटील सुनील मारुती पाटील, पांडुरंग कृष्णाजी पाटील, स्वाती सदानंद पाटील, मंदा महादेव फठाण, इंदिराताई महादेव मेदार व नाझिया समीर सनदी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले तर अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यासह इतर दोन सदस्य अनुपस्थितीत होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर श्रवण कुमार यांनी अविश्वास मंजूर झाल्याची माहिती दिली. त्यानंतर उपस्थित सदस्यांनी विजयाची खूण दाखवून आनंद साजरा केला. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर लवकरच अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून खानापूर शहर आणि परिसरात हलगा पंचायत सदस्यांविरोधक दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत नागरिकांमध्ये सातत्याने चर्चा होत होती संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हालगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?