बातम्या

आता ग्राम पंचायत मध्ये मिळणार जन्म, मृत्यू दाखला

ग्रा. पं. सेक्रेटरींना उपनोंदणी अधिकाऱ्याचा दर्जा;

बेळगाव: आता जन्म-मृत्यूचा दाखला ग्रामपंचायत कार्यालयातूनच मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार आहे. ग्रा. पं. सेक्रेटरींना उपनोंदणी अधिकाऱ्यांचा दर्जा देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

राज्यात 1 जानेवारी 2000 पासून जन्म-मृत्यू नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. जन्म किंवा मृत्यूच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पंचायत सेक्रेटरींना उपनोंदणी अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आला आहे.

जन्म, मृत्यू दाखला नियमावली काय आहे?

जन्म अथवा मृत्यू झालेल्या २१ दिवसांच्या आता नोंदणी करण्यात यावी. त्यांना एक मोफत दाखला देण्यात येणार आहे. ३० दिवसांच्या आत नोंदणी करणाऱ्यांकडून प्रत्येक दिवसाला २ रु. दंड आकारण्यात यावा. ३० दिवसांपेक्षा अधिक काळ झालेल्या घटनेची नोंद करण्यात येऊ नये. त्यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन ग्रा. पं. अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे.

Birth and Death registration ३० दिवसांपेक्षा अधिक काळ झालेल्या घटनांमध्ये तहसीलदारांच्या अनुमतीने नोंद करण्यात यावी. यासाठी प्रत्येक दिवसाला ५ रु. दंड आकारावा. एक वर्षांपेक्षा अधिक उशीर झालेल्या प्रकरणात प्रथम दर्जाचे दंडाधिकारी अथवा महाप्रांत दंडाधिकारी यांच्या आदेशाने नोंद करावी. यासाठी रोज १० रु. दंड आकारावा, असे आदेश बजावण्यात आले आहेत.

सरकारच्या आदेशामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर जन्म, मृत्यू उतारे उपलब्ध होणार आहेत. उतारा मिळवण्यासाठी करावी लागारी धावपळ थांबणार आहे. याचा फायदा गावकऱ्यांना होणार आहे.

🧑🏻‍💻बातम्यांसाठी ग्रुप नक्की जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GcqDaAQR1nRItesBrMuvIX

Birth, death certificates will now be issued in gram panchayats

Birth, death registrations: Gram panchayats to levy fee from July 1

How To Get Birth Certificate, Documents Required | Apply For death Certificate | Apply For Birth Certificate

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते