खानापूर
बिम्समध्ये धक्कादायक प्रकार; रुग्णाचेच कातडे कापल्याची घटना उघडकीस
बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स) रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाचे चक्क कातडेच कापण्यात आले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे धाव घेतली. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे.
या घटनेनंतर बिम्समधील आरोग्यसेवेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसंदर्भात मोठी बेफिकिरी झाल्याचे चित्र आहे.