खानापूर

मणतुर्गा शाळेचे श्री मारुती देवकरी व गुंडपी शाळेचे श्री दत्तात्रय देसाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

खानापूर: मणतुर्गे सरकारी पुर्ण प्राथमिक मराठी शाळेचे सहशिक्षक श्री मारुती महादेव देवकरी आणि गुंडपी सरकारी पुर्व प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय शंकर देसाई यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांने दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी बेळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री सतीश जारकीहोळी व जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

उद्या गांधीभवन बेळगांव कार्यालय येथे शिक्षक दिन साजरा होणार आहे.

श्री. मारुती एस देवकरी हे मणतुर्गा (ता. खानापूर) गावचे सुपुत्र असून त्यांनी शिक्षक म्हणून सुरूवात धोंडगड्डे (ता. हुक्केरी ) येथुन केली तिथे त्यांनी 5 वर्षे, नंदीहळ्ळी येथे 2 वर्षे, तिवोली येथे 12 वर्षे, शेडेगाळी येथे 4 वर्षे व आता आपल्या गावी 9 वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे सेवा करत आहेत. 

या यशाबद्दल श्री मारुती महादेव देवकरी व श्री दत्तात्रय शंकर देसाई सर यांचे तालुक्यात अभिनंदन व कौतुक होत आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते