खानापूर

खळबळजनक! दरोडेखोरांकडून महिलेची गळा दाबून हत्या, सोनं लंपास

बेळगाव, गणेशपूर – लक्ष्मी नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये घुसून अज्ञात दरोडेखोरांनी 49 वर्षीय महिलेला गळा दाबून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना संपूर्ण परिसरात खळबळ माजवणारी ठरली आहे.

मृत महिलेचे नाव अंजना अजित दड्डीकर असून त्या आपल्या पतीसोबत लक्ष्मी नगरमधील अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. पती अजित दड्डीकर हे ऑटोचालक असून काल संध्याकाळी ते कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना ही घटना आढळून आली.

घरात अंजना बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अंजना यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील दागिने आणि सोन्याची अंगठी चोरीस गेली आहे. त्यामुळे ही घटना चोरीसाठी करण्यात आलेल्या हत्येची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) पथकाने भेट देऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान, कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते