खानापूर
दहावी परीक्षेचे टेन्शन! नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या
बेळगाव : SSLC परीक्षेमुळे तणावात आलेल्या विद्यार्थिनीने नापास होण्याच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याची घटना बेळगावच्या विश्वेश्वरय्या नगर फॉरेस्ट कॉलनीत घडली. दिपिका राजेंद्र बडिगेर (16) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
SSLC परीक्षेत नापास होण्याच्या भीतीमुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. आज ती दुसऱ्या विषयाची परीक्षा देऊन परत आली होती. संध्याकाळी कुटुंबीय घरी परतले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थिनीच्या निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, आई-वडिलांच्या आक्रोशाने परिसर हळहळला.
दरम्यान, घटनास्थळी APMC पोलीस दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे आणि प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.