खानापूर
प्रेमभंगाचा धक्का? युवकाशी फोनवर बोलल्यानंतर युवतीची आत्महत्या
बेळगाव: येथील नेहरू नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विजयपूरची रहिवासी ऐश्वर्यालक्ष्मी गलगली (24) या युवतीने आत्महत्या केली आहे. ती गेल्या तीन महिन्यांपासून बेळगावच्या एका ‘एक्स’ कंपनीत काम करत होती. एमबीए पदवी घेतलेली ही युवती सायीकृपा पीजीमध्ये राहात होती.

मंगळवारी नेहमीप्रमाणे पीजीला परतल्यानंतर ती मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. त्यानंतर ती आपल्या खोलीत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. काही वेळानंतर एक युवक घाईघाईने पीजीकडे धावत येताना दिसला.
युवतीच्या आत्महत्येमागे प्रेमभंग कारणीभूत असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तिच्या मृतदेहाची शवविच्छेदन चाचणी करण्यात आली असून, पोलिसांनी तिच्या शेवटच्या संभाषणातील युवकाचा शोध सुरू केला आहे. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.