बेळगाव

यंदाही धबधब्यांवर जाण्यास बंदी

Khanapurvarta: काल रविवार आणि रिमझिम पावसाची सुरूवात झाल्याने अनेकांनी तालुक्यातील धबधब्यावर जाण्यासाठी भयानक गर्दी केली होती.  अनेक जणांनी काल भर रस्त्यात गोंधळ घातला होता. अनेक गैरप्रकार घडत आहेत यामुळे फॉरेस्ट खात्याने यंदाही पश्चिम भागातील सर्व धबधबे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मान,चिखले,पारवाड़,चोरला,सुर्ला  हे सर्व धबधबे बंद करण्यात आले आहेत.


पश्चिम भागातील धबधब्यांची ठिकाणे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहेत. यावर उपाय म्हणून वर्षा पर्यटन स्थळांवर सुरक्षा कठड्यांची उभारणी केली जाणार आहे. या धबधब्यांचा ताबा ग्राम अरण्य समित्यांकडे देण्यात येणार आहे. त्यासाठीची ठराव प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्याशिवाय आवश्यक पर्यटन सुविधाही
पुरविण्याचा वनविभागाचा विचार आहे. पुढील महिनाभरात या सुविधा पूर्ण केल्या जातील. त्यानंतरच पर्यटकांसाठी ही ठिकाणे खुली केली जातील. तोपर्यंत नियम मोडून कोणीही तेथे जाण्याचे धाडस करू नये. – सुनिता निंबरगी, एसीएफ खानापूर

खानापूर हे नैसर्गिक संपत्तीने नटलेले असून येथे पर्यटनाची अनेक आकर्षणे आहेत. खानापूर तालुक्यातील जांबोटी-कणकुंबी भागासह बेळगावच्या सीमेवरील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.

पावसाळ्यातील हिरवळ, घनदाट जंगल, वाहणाऱ्या नद्या, ओसंडून वाहणारे धबधबे व कालव्यांमुळे पर्यटन सर्वांनाच आवडते… मात्र, आज काल सोशल मिडीयामुळे अनेक जन या पर्यटन स्थळांचा आनंद कमी व सेल्फी फोटो मध्ये जास्त गुतलेले असतात. दिवसेंदिवस पर्यटनस्थळांवर वाढलेले गैर प्रकार, पार्ट्या आणि सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालणे यामुळे पावसाळ्यात पर्यटकांना निसर्गरम्य ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात येत आहे.

पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करणे, वाहनात बसून मद्यपान करणे, आडवी वाहने थांबवून रस्त्यावर गुंडगिरी करणे, बेधुंद गाणी वाजवणे, धबधब्याला चिकटून सेल्फी काढणे, धबधब्या समोर उभे राहून इतर नागरिकांना अपमानित करणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाण्याचा अचूक अंदाज बांधता येत नसल्याने गेल्या काही वर्षांत मद्यप्राशन करून बुडून मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत.

कणकुंबी जवळील शिंबोली धबधब्याच्या तोंडात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर धबधबा परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सलग दोन वर्षांपासून हे निर्बंध कायम असून यंदाही हे निर्बंध कायम ठेवले आहेत.

Waterfalls near khanpaur, Waterfalls near Belgaum

चिखले पारवाड सवतुरा धबधबा, मान सिम्बोला वझर, हुळंद तळीचा वझर, पारवाड देऊची न्हय धबधबा, कॅसलरॉक दूधसागर धबधबा, किरावळे धबधबा, जांबोटी वज्रपोहा, महिपाळगड सुंडी धबधबा, हिडकल डॅम यासह चोर्ला घाट, जांबोटी हब्बनहट्टी, तिलारी नगर स्वप्नवेल पॉईंट, तिलारी घाटमाथा, ग्रीन व्हॅली, दोडामार्गजवळ मंगेली

Chikhale Parwad Savtura Waterfall, Man Simbola Vazhar, Huland Tali Vazhar, Parwad Deuchi Nhaya Waterfall, Castlerock Dudhsagar Waterfall, Jamboti Vajrapoha, Mahipalgad Sundi Waterfall, Hidkal Dam including Chorla Ghat, Jamboti Habbanahati, Tilari Nagar Swapnavel Point, Tilari Ghatmatha, Green Valley, Mangeli near Dodamarg

Khanapur is famous for? खानापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? धबधबे?

असोगा, हलशी मंदीर, कणकुंबी, चिखले धबधबा, मलप्रभा नदी, विठ्ठला-रुक्मिणी धबधबा, वज्रपोहा (महादाईहोल) धबधबा, बोरा धबधबा, जांबोटी लपलेला धबधबा, देवचिहट्टी धबधबा, मानगुंडी धबधबा, बेतनेगुंडी धबधबा, डोंगरगाव, फणसफळ

Chikhale waterfall,Malaprabha River,Vitthala-Rukmini Waterfalls,Vajrapoha (Mahadaayihole) Falls,Bora Falls,Jamboti Hidden water falls,Devachihatti Falls,Maanagundi Falls,Betnegundi Waterfalls,DONGARGAON FALLS,Sundi Waterfalls

chikhale falls distance from belgaum,tilari falls distance from belgaum,amboli falls near belgavi,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते