खानापूर

अंकले येथे बैलांची चोरी, चोरट्यांनी कुलूप तोडून बैले पळवली

खानापूर: शहरापासून जवळचं असलेल्या माळअंकले गावात काल मध्यरात्री शेतातील घरातून दरवाजा कुलुप तोडून बैलजोडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

माळअंकले गावातील संतोष राजाराम चोपडे यांनी  गावापासुन दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतातील घरात नेहमीप्रमाणे बैलजोडी व गुरे बांधली होती. काल 17 ऑगस्ट रोजी 8.30 वाजता गुरांचे दूध काढून गुरांना व बैलांना गवत घालून दरवाजा बंद करून घरी परतले.

परत सकाळी गुरांना गवत घालण्यासाठी शेतात गेले असता त्यांना शेतातील घराचा कुलूप तोडून बैलांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी त्वरित गावातील नागरिकांसोबत शोधाशोध सुरू केली . बैले सापडली नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी गनेबैल टोल तसेच जवळील सीसीटिव्ही फुटेज चेक करून शोध सुरू केला आहे.

एक ते दिड लाखांच्या बैलांची चोरी झाल्याने या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते