बेळगाव

दुर्मिळ प्रकार: वासरू देत आहे दिवसाला दोन लिटर दूध

आपल्याकडे शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांचे पालन करतात. अशावेळी जनावरातून दुर्मिळ घटना समोर येतात. अशीच एक घटना बिजगर्णी (ता. बेळगाव) गावामध्ये समोर आली आहे.

गाभण न होता, वासराला जन्म न देता दररोज दोन लिटर दूध देत असल्याचा दुर्मिळ प्रकार बिजगर्णी येथील सदानंद मोरे यांच्या गोठ्यात पाहायला मिळत आहे.

मागील आठवड्याभरापासून हे वासरु दिवसाला दोन लिटर दूध देऊ लागले आहे. हा प्रकार बघण्यासाठी मोरे कुटुंबीयांच्या घरामध्ये वर्दळ वाढू लागली आहे.

हे वासरु 28 महिन्यांचे असले तरी गाभण नाही, शिवाय त्यांने वासराला देखील जन्म दिला नाही. मात्र अचानक वासराची कास मोठी झालेली पाहून ती दाबून पाहिली असता दूध यायला लागले. आता हे वासरू दिवसाला 2 लिटर दूध देऊ लागले आहे.

या प्रकारामुळे कुटुंबीयांनाही आश्चर्य वाटू लागले आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते