क्राईम

रेल्वेत हल्ला केलेला माथेफिरू सीसीटिव्ही कैद

खानापुर: एका माथेफिरू प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये टीसी आणि इतर पाच जणांवर चाकूने हल्ला केल्याची घटना चालुक्य एक्स्प्रेस Paducheri-Dadar Chalukya Express लोंढा-खानापूर दरम्यान घडली. 

चालत्या ट्रेनमध्ये  टीसीने तिकीट विचारले असता. सदर व्यक्तीने तिकिट देण्यास नकार दिला यावरून टीसी आणि व्यक्तीमधे बाचाबाची झाली.  त्यानंतर काही जण हे थांबवण्यासाठी आले असता सदर व्यक्तीने  स्वतः जवळ असलेल्या चाकुने टीसी आणि इतर पाच जणांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून टीसी सोबत  इतर 3 जन जखमी झाले आहेत. सदर घटना गुरुवार दि. 16 मे रोजी सायंकाळी लोंढा- खानापूर दरम्यान चालुक्य एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. पोनुनारायण वर्मा (वय २५) रा. शेषा, जिं. झांशी, उत्तरप्रदेश असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. पोनुनारायण हा रेल्वे मध्ये क्लिनर कर्मचारी होता. तसेच जखमी टीसी अश्रफ अली वय 27 यांच्या हाताला दुखापत झाली आहे. याचबरोबर महम्मद सोहेल वय 23 रा. गदिना, जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश, सतीश गणपती बेंदरे वय 31 रा. फुलबाग गल्ली अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घेटनेची पूर्ण माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन यांनी घेतली.

केवळ तिकीटाची विचारणा केल्यामुळे त्याने टीसीसह अन्य चौघांवर हल्ला केला आहे का? की इतर कोणते कारण आहे हे देखील पोलीस तपासात आहेत. यासाठी रेल्वे पोलिसांचे एक पथक जारी करण्यात आले आहे.

हल्लखोर सीसीटिव्ही मध्ये कैद

शोध सुरू असताना पोलिसांना चाकूने खून, आणि चौघांना जखमी करून फरार झालेल्या मातेफिरूचा सीसीटिव्ही फुटेक पोलिसांच्या हाती लागला आहे.  यासंबंधी पोलिसांना एक सिसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. पण या फुटेजमध्ये हा हेल्लेखोराचा चेहरा इतका  स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनी जखमी कडून त्याचे वर्णन करून घेऊन त्याचे चित्र रेखाटले आहे.  सीसीटिव्ही फुटेज आणि फोटोच्या मदतीने पोलीस या हेल्लेखोराचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या