क्राईम

मिरज स्टेशनवर कर्नाटकातील प्रवाशावर चाकूहल्ला

मिरज : गवंडीकाम करण्यासाठी मिरजेत आलेल्या कर्नाटकातील प्रवाशावर चाकूहल्ला करून लूटमार करण्यात आली. मिरज रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहावर हा प्रकार घडला. या हल्ल्यात यल्लाप्पा इराप्पा वडर (वय ३०, रा. तालीकोट, ता. मुद्देबिहाळ, जि. विजापूर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी तुषार जितेंद्र कांबळे (१९, रा. ख्वाजा वसाहत, मिरज) याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. कर्नाटकातील यल्लाप्पा वडर हे गवंडीकाम करण्यासाठी मिरजेमध्ये आले होते. काम आटोपून ते गावी परत जाण्यासाठी मिरज रेल्वे स्थानकात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?