खानापूर

असू येथील 22 वर्षीय तरुणाची गोव्यात आत्महत्या

रामनगर: जोयडा तालुक्यातील असू येथील पांडुरंग नारायण मिराशी (वय 22) या युवकाने गोव्यातील बोळकणें साकोंडे येथील एका बंद घराच्या मागील बाजूस गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.

पांडुरंग मिराशी हा रंगकाम करत होता आणि तो कणकवली येथून असू येथे येण्यासाठी निघाला होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मडगाव येथील रुग्णालयात पाठवून, बुधवारी सायंकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद कुळे (गोवा) पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?