लडाखमध्ये सरावादरम्यान भारतीय सैन्याचे पाच जवान शहीद
नवीदिल्ली: लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) झालेल्या भीषण घटनेत भारतीय लष्कराचे तब्बल पाच जवान शहीद झाले आहेत. हे जवान सराव करत असताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेले आहेत.
लेहच्या दौलत बेग ओल्डी भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ नदी ओलांडण्याच्या सरावादरम्यान शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांमध्ये ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर अर्थात जेसीओचाही समावेश आहे.
आज पहाटे तीनच्या सुमारास हे जवान नियमित सरावावर होते. लेहपासून 148 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिर मोड़जवळ बोधी नदीत आपल्या टी-72 टाकी ओलांडत असताना अचानक पाण्याची पातळी वाढू लागली, आणि जवान नदीत बुडाले.
5 Army soldiers swept away
तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आणि पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
indian 5 armyman swept crossing river during tank exercise in Ladakh
indian army 5 soldier death