गणेबैल टोलनाक्यावर “पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांसाठी” टोल माफी- कॉंग्रेसचे निवेदन
खानापूर: महाराष्ट्रात वारकऱ्यांना पंढरपूरला जाताना व येताना संपूर्ण टोलमाफी आहे त्याच धर्तीवर गणेबैल टोल नाक्यावर सुद्धा वारकऱ्यांना टोल माफी द्यावी अशी मागणी खानापूर ब्लॉक कॉंग्रेस तर्फे आज करण्यात आली.
आज खानापूर ब्लॉक कॉंग्रेस तर्फे गणेबैल टोल नाक्यावर निवेदन देण्यात आले. या निवेदनात वारीसाठी जे वारकरी पंढरपूरला जातात त्यांच्या गाड्यांना जाताना व परत येताना टोल माफ़ी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात टोल चे मॅनेजर मंजूनाथ बागेवाडी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.
टोल माफी साठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांसाठी काही नियम
- गाड्यावर भगवी पताका लावावी.
- खानापूरहून जाताना दोन नंबर च्या लेन मधून गाड्या घेऊन जाव्या
- तसेच परत येतांना नऊ नंबर च्या लेन मधून गाड्या घेऊन याव्या.
याप्रसंगी महादेव कोळी , ॲड. इश्वर घाडी साहेब, महांतेश राऊत, प्रसाद पाटील जोतीबा गुरव दिपक कवठनकर, तोहीद , सुर्यकांत कुलकर्णी, बबन सोझ वाटरे ईश्वर बोबाटे, रामा गुरव, म्हात्रू गुरव, महेश गुरव लक्ष्मण पाखरे सातेरी गुरव तसेच सावित्री मादार , गीता आंबरगट्टी , वैष्णवी पाटील, दिपा पाटील, सखुबाई पाटील, दिपाश्री पाटील उपस्थित होते. तसेच गणेबैल टोलनाक्यातर्फे मॅनेजर मंजूनाथ, प्रकाश आनगोळकर हे उपस्थित होते.