सचिव पदी निवड होताच डॉ. अंजली निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांची भेट
बेंगळूरू: नुकताच डॉ. अंजली निंबाळकर यांची अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सचिव पदी निवड झाली आहे. बेळगांव जिल्ह्यातून किंवा कारवार लोकसभा मतदार संघातून प्रथमच डॉ. अंजली निंबाळकर यांच्या रूपाने एका महिलेस कॉंग्रेस पक्षाने “एआईसीसी सचिव” हे मोठे मानाचे पद दिले आहे.
हा जिल्ह्याचा बहुमानच म्हटले तर वावगे ठरणार नाही.
याआधी हे पद आपल्या जिल्ह्याचे नेते व विद्यमान पालकमंत्री सतिश आण्णा जारकीहोळी यांना पक्षाने दिले होते व तेलंगना या राज्याची जबाबदारी दिली होती.
त्यानंतर आता डॉ. अंजली निंबाळकर यांना हे पद देऊन गोवा या राज्याची व दिव दमन नागरा हवेली या केंद्रशाशित प्रदेशाची जबाबदारी दिली आहे.
पक्ष देईल ते काम निष्ठेने करत रहा पक्ष तुमची जबाबदारी घेईल हेच पक्षाने ताईंच्या निवडीतून दाखवून दिले आहे.
एआयसीसी सचिव पदी निवड झाल्यानंतर काल डॉ. अंजली निंबाळकर यांनी बेंगलोर येथे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.