कागेरी यांच्या आरोपांना डॉ. अंजली निंबाळकर यांचे प्रत्युत्तर
खानापूर: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी कर्नाटक राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. कर्नाटक उर्वरित 14 जागांसाठी 7 मे दिवशी मतदान होणार असून कर्नाटकात अजूनही जोरदार प्रचार चालू आहे. उर्वरील उमेदवारांचा प्रचारासाठी आता बडे नेते या 14 मतदारसंघात आपला प्रचार दौरा सुरु करत आहेत. बेळगाव आणि कारवार लोकसभा निवडणूक देखील 7 एप्रिल रोजी होणार असून देशाचे पंतप्रधान देखील याभागात प्रचार सभा घेत आहेत. भाजप आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचार सभांमध्ये जुन्या मुद्यांवरून आरोप प्रत्यारोप करत आहेत.
2017 मध्ये एक हिंदू युवक परेश मेस्ता याचा मृतदेह होन्नावर येथे आठळून आला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणात जातीय दंगली उसळल्या होत्या. तोच जुना वाढ काढून कारवार लोकसभा भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी ( Vishweshwar Hegde Kageri) यांनी कॉंग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर (Dr. Anjali Nimbalkar) यांच्या पतीबद्दल आरोप केला.
काँग्रेस नेत्यांच्या सूचनेवरून तत्कालीन आयजी हेमंत निंबाळकर (Hemant Nimbalkar)यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याच्या आरोपावर डॉ. अंजली निंबाळकर यांनी भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्यावर पलटवार केला आहे
परेश मेस्ताच्या मृत्यूचे राजकारण करून भाजपने आपली संधी साधून घेतली. भाजपने कारवार, होन्नावर, शिरसी, येथे जाळपोळ केली. समाजात तडा निर्माण केला. जाळपोळ करून फक्त स्वताचा बचाव करण्यासाठी भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे पोलीस व्हॅनमधून पळून गेले. पुढे चौकशीतून मेथा मृत्यू प्रकरणाबाबत सत्य उजेडात आले व भाजपचा खोटारडेपणा जगासमोर आला
या प्रकरणात तुमच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी तुम्ही कोणाशी तडजोड केली? माझ्या पतीवर मेस्ता प्रकरणात कागेरी यांनी गुन्हा दाखल केला. कागेरी त्यावेळी या भागाचे आमदार होते. आम्ही न्यायासाठी लढा दिला. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला आणि हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले आहे. रिपोर्ट आल्यानंतर विचारायला कोणी गेलं होत का? पण आम्हीच हमी दिली आणि गरीब कुटुंबाला जगवले. तुम्ही आग लावत रहा, आम्ही त्याला पाणी देत राहू, असा पलटवार अंजली निंबाळकर यांनी भाजपचे उमेदवार कागेरी यांच्यावर केला आहे.
सहा वेळा आमदार, मंत्री राहिलेल्या व्यक्तीसाठी अशी विधाने शोभत नाहीत, एका युवकाच्या मृत्यूचा राजकारणासाठी वापर केला जात आहे, हे निंदनीय आहे.
भाजप जातीचे राजकारण करत आहे. हिंदू-मुसलमान तरुणांची दिशाभूल केली जात आहे. भाजप फक्त ‘श्री राम’ म्हणते पण ‘जय सिया-राम’ म्हणत नाही’ कारण भाजप महिलेचा आदर करत नाही, जन्म दिलेली आई नको? असे करून भाजप हिंदू धर्म बिघडवत आहे.
मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा बागड जातीं सांगितल्या आहेत त्यांमध्ये हिंदू,मुस्लीम,ख्रिश्चन,सिख, इसाई, एसी, एसटी अश्या सर्व जाती मिळून आपला हिंदू धर्म आहे. तो हिंदू धर्म बिघडविण्यासाठी आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजप हिंदूंचा वापर करत आहे. जर तुमचे घर तुमच्या मुलांचे भविष्य चांगले व्हायचे असेल तर या धर्माचे राजकारण करणाऱ्या भाजप पासून दूर रहा आणि कॉंग्रेसला आपल्या आणि आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मतदान करण्याचे आवाहन अंजली निंबाळकर यांनी कारवार येथील सभेत बोलताना केले.