खानापूर

शाळांना उद्या 24 जुलै देखील सुट्टी 

बेळगाव : जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव, कित्तूर, खानापूर आणि बैलहोंगल तालुक्यातील शाळांना 24 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बेळगावचे उपायुक्त मोहम्मद रोशन यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श् वभूमीवर सर्व शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

केवळ खानापूर आणि बेळगाव तालुक् यांतील विद्यापीठपूर्व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते