खानापूर

खानापूरजवळ दुचाकींची भीषण धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी!

खानापूर: खानापूर-जांबोटी मार्गावरील शिवाजीनगर रेल्वे पुलाजवळ आज, शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला, ज्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.

नागुर्डा येथील अमोल खोबान्ना पाखरे (वय २७) हे आपल्या होंडा शाइन दुचाकीवरून गावाकडे जात असताना, रामगुरवाडीचे शंकर धाकलु गुरव (वय ३५) हे आपल्या काका रवळू गुरव (वय ६५) यांच्यासह खानापूरकडे येत होते. रेल्वे पुलाजवळ दोन्ही दुचाकी एकमेकाला धडकल्या. या अपघातात शंकर गुरव यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे काका रवळू गुरव आणि अमोल पाखरे गंभीर जखमी झाले. खानापूरच्या सरकारी दवाखान्यात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगावला पाठवण्यात आले असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, सामाजिक कार्यकर्ते भरमाणी पाटील आणि भाजपा युवा नेते पंडित ओगले यांनी सरकारी दवाखान्यात जाऊन मृतकाच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या