क्राईम

सौंदत्ती यल्लम्मा दर्शन घेऊन परतत असताना अपघात: १३ ठार

हावेरी : बेळगांव जिल्यातील सौंदत्ती यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना उभ्या असलेल्या लॉरीला टीटी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 13 जण जागीच ठार झाले.

हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी येथील गुंडेनहळ्ळी क्रॉसजवळ ही घटना घडली. उभ्या असलेल्या लॉरीला टीटी वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला.

मृत शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील होलेहोन्नूरजवळील एम्मिहट्टी गावचे रहिवासी होते. परशुराम (४५), भाग्य (४०), नागेश (५०), विशालाक्षी (५०), सुभद्राबाई (६५), पुण्य (५०), मंजुळा बाई (५७), आदर्श (२३), मनसा (२४), रूपा (४०), मंजुळा (५०) आणि ४ व ६ वर्षांच्या मुलाची नावे आहेत.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच बायडगी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. haveri accident, pune- banglore highway accident

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या