खानापूर आप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
खानापूर: आज खानापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनियुक्त युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार श्री शिवस्मारक सभागृहात पार पडला. अध्यक्ष श्री. रायप्पा, शहर अध्यक्ष श्री. इसाक आणि ग्रामीण अध्यक्ष श्री. साईश यांचा सत्कार करण्यात आला.

याचबरोबर आम आदमी पार्टीचे खानापूर तालुका अध्यक्ष श्री. भैरू कुंभार आणि त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करण्यात आले.

तसेच भाजपचे युवक नेते श्री. कुबेर यांनी देखील आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या खानापूर तालुक्यातील जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने मैदानात काम करत आहे, यामुळे आप आणि भाजप पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत.
येत्या काळात आणखी अनेकजण काँग्रेस पक्षात सामील होणार आहेत. असेही आमदार डॉ. अंजली निंबाळकर यावेळी म्हणाल्या.
कार्यक्रमात काँगेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
