खानापूर

शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी शिमोगाच्या प्रशिक्षित हत्तींचे पथक जळगे गावात दाखल

खानापूर तालुक्यातील जळगे – करंबळ आदी भागामध्ये एका हत्तीची निर्माण झालेली दहशत आणि शेतकऱ्यांना होणारे नुकसान थांबवण्यासाठी वनविभागाने नवा उपाय अवलंबला आहे. शिमोगा येथील तज्ज्ञ हत्तींचे पथक हत्ती आणि अन्य वन्य प्राण्यांना जेरबंद करण्यासाठी खानापुरात दाखल झाले आहे.

खानापूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन ग्रामस्थ आणि शेतकरी चिंतेत आहेत. विशेषतः करंबळ-जळगे आदी गावात रानटी हत्तींच्या उपद्रवाने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एका रानटी हत्तीने येथे मुक्त संचार सुरू केला आहे, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी वनविभागाने शिमोगा येथील प्रशिक्षित हत्तींच्या पथकाला खानापुरात आणले आहे. खानापुरचे आरएफओ श्रीकांत पाटील, नंदगड विभागीय वनाधिकारी माधुरी दलवाई आणि इतर वनविभागाचे अधिकारी यामध्ये सक्रियपणे काम करत आहेत. वन्य प्राण्यांना जेरबंद करण्यासाठी सर्व संबंधित विभाग एकत्र येऊन कडी सुरक्षा ठेवून जनजागृती करत आहेत.

ही मोहीम वनविभागाच्या कडून जोरदारपणे राबवली जात असून शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना दिलासा मिळवण्यासाठी प्राधिकृत अधिकारी परिश्रम घेत आहेत.

बाहेरून आलेले हे हत्ती पाहण्यासाठी जळगे येथे लोकांनी एकच गर्दी केली होती

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या