खानापूर तालुक्यातील खराब बसेसचा प्रश्न कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. काल सकाळी नंदगड येथे कुंभार्डा बस अचानक बंद पडल्याने विद्यार्थी व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
शाळेत जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी व कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक यांना बस बंद पडल्यामुळे काही काळ रस्त्यावरच थांबावे लागले. काही दिवसापूर्वी खराब बसमुळे तालुक्यात अपघाताच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे काल पुन्हा नंदगडमध्ये बस बंद पडल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यासाठी गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी देखील आगारपामुखांची भेट घेऊन चांगल्या बस सोडण्याची टाकीत दिली होती.
याचबरोबर काल विद्यार्यांनी,नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की, “खराब बसेस रस्त्यावर सोडू नयेत. वेळेवर दुरुस्ती करून सुरक्षित बसेसच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात.”
तालुक्यातील बसच्या समस्या प्रशासन कधी ठीक करते हे पाहावे लगावणार आहे. नसेल तर विद्यार्थी आणि नागरिकांना रस्त्यांवर उतरून जाब विचारावा लागणार आहे.