9 कोटींचे खेळते भांडवल असलेली गर्लगुंजी येथील श्री ओमकार पतसंस्था प्रगतीपथावर
श्री ओमकार मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघाची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात.
गर्लगुंजी (प्रतिनिधी): श्री ओमकार मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघ, नियमित गर्लगुंजी यांची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमिळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. अनंत ज्योतिबा मेलगे तर उपाध्यक्षस्थानी श्री. नामदेव परशराम धामणेकर विराजमान होते.

संस्थेच्या अहवालानुसार, 31 मार्च 2025 अखेरीस संस्थेकडे एकूण 570 सभासद असून, संस्थेचे खेळते भागभांडवल ₹9 कोटी 21 लाख 51 हजार 356 आहे. वार्षिक लाडाला ₹23 कोटी 16 लाख 27 हजार 275 एवढी झाली असून, संस्थेने ₹5 कोटी 98 लाख 63 हजार 130 कर्ज वाटप केले आहे. यावर्षी संस्थेला एकूण ₹3 लाख 32 हजार 240 निव्वळ नफा झाला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मऱ्याप्पा पाखरे यांनी केले. अहवाल वाचन संस्थेचे सेक्रेटरी श्री. सातेरी गोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. रेखा यरमाळकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत सौ. माधुरी शिवाप्पाचे यांनी केले.
व्यासपीठावर नंदकुमार पाटील, यल्लाप्पा पाटील, शिवाजी पाखरे, लुमाना गोरे, संजय मोरे, संजय कोलकार, रुक्मिणी धामणेकर, लक्ष्मी पाखरे तसेच संस्थेचे सल्लागार, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, ज्येष्ठ सभासद आणि आदर्श शिक्षक सर नामदेव कुंभार, सर पी. डी. कुंभार, सर सुदेश मेलगे, सौ. किरण धामणेकर उपस्थित होते.