गोव्यात कामानिमित्त गेलेल्या तिओली येथील नारायण घाडी यांचे हृदयविकाराने निधन
तिओली (ता. खानापूर) : तिओली येथील रहिवासी ह.भ.प नारायण कल्लाप्पा घाडी (वय 50) यांचे गोवा येथील वाळपई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना आज (शनिवार) सकाळी 4 वाजता उघडकीस आली.

नारायण घाडी हे गेल्या काही वर्षांपासून शिर-सावर्डे वाळपई येथे कामानिमित्त कुटुंबासोबत वास्तव्यास होते. अत्यंत शांत, नम्र स्वभावाचे आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची गावात ओळख होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक विवाहित मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज दुपारी 4 वाजता तिओली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
ತೀವೊಲಿ ಗ್ರಾಮದ ನಾರಾಯಣ ಕಲ್ಲಪ್ಪ ಘಾಡಿ (50) ಅವರು ಗೋವಾದ ವಾಲ್ಪೈನಲ್ಲಿ ಹೃದಯಾಘಾತದಿಂದ ಇಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 5 ಗಂಟೆಗೆ ನಿಧನರಾದರು. ಅವರು ಕಳೆದ ಹಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ತೀವೊಲಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜರುಗಲಿದೆ.
Narayan Kalappa Ghadi (50), a resident of Tivoli, passed away due to a heart attack in Valpoi, Goa, early this morning at 5 AM. He had been working there for several years. His final rites will be held today at 4 PM in Tivoli village.