खानापूर
कोणशेत क्रॉसजवळ टुरिस्ट कारचा अपघात; चालक थोडक्यात बचावला
खानापूर: जोयडा तालुक्यातील कोणशेत क्रॉसजवळ टुरिस्ट कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. वेगात असलेल्या कारचा चालक एका वळणावर नियंत्रण गमावल्यामुळे कार पलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली.
ही कार दांडेली येथून गोव्यात प्रवासी आणण्यासाठी निघाली होती. मात्र कोणशेत क्रॉसजवळ अचानक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाने वेळेवर सावधगिरी बाळगल्यामुळे तो सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी ठरला.
घटनास्थळी काही वेळासाठी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र मोठा अनर्थ टळल्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.