खानापूर: रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी विविध पदांसाठी विद्यार्थी निवडणुका मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडल्या. विद्यार्थ्यांना लोकशाही निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरणे, चिन्ह वाटप, अर्ज माघार घेणे, प्रचार करणे, मतदानासाठी आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून करणे, मतमोजणी प्रक्रिया, सुरक्षा व्यवस्था याबाबत सखोल माहिती मिळवली व प्रत्यक्ष अनुभव घेतला. संपूर्ण प्रक्रिया खेळीमेळीच्या आणि आनंदमय वातावरणात पार पडली.
या निवडणुकीत खालील विद्यार्थ्यांनी विजय संपादन केला:
- जनरल सेक्रेटरी: कु. देवानंद शेळके
- विद्यार्थिनी प्रतिनिधी: कु. रसिका गावडा
- क्रीडा प्रतिनिधी: कु. रोहन कांबळे, कु. रेणुका तोरगल, कु. मोहिनी देसाई
- सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी: कु. प्रणाली घाडी
- परीक्षा विभाग प्रतिनिधी: कु. सानिका तिनेकर
- सहल विभाग प्रतिनिधी: कु. काजल गावडे
- ग्रंथालय प्रतिनिधी: कु. वनश्री चाफळकर
- वर्ग प्रतिनिधी: कु. प्रणाली देसाई, कु. प्रदीप अवणे, कु. ममता जोशीलकर, कु. कृणाल पंडित
या निवडणुकीचे आयोजन प्राचार्या सौ. शरयू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. गुंडू कोडला आणि प्रा. संदीप पाटील यांनी प्रभावी कामगिरी बजावली. तसेच प्रा. डी. व्ही. पाटील, प्रा. प्रकाश पाटील, प्रा. रेणुका पाटील, प्रा. सोनी गुंजीकर, प्रा. इमिलिया फर्नांडिस, श्री. देवेंद्र घाडी आणि श्री. शिवाजी बेतगावडा यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक मौल्यवान अनुभव ठरला असून त्यांना लोकशाही प्रक्रियेची जाणीव व समज मिळवता आली.