खानापूर

अनमोड घाटात रस्ता कोसळला; 2 सप्टेंबर 2025 पर्यंत 60 दिवसांची वाहतूक बंदी

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा तातडीचा आदेश; प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

खानापूर / बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटात रस्ता पूर्णपणे खचल्याने वाहतूक पूर्णपणे धोकादायक बनली आहे. विशेषतः दूधसागर मंदिराच्या खालच्या भागात, मागील दोन दिवसांपासून जमिनीत भेगा पडत होत्या. अखेर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास संपूर्ण रस्ता दरडीसह खाली कोसळला.

या घटनेनंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने आदेश काढून पुढील 60 दिवसांसाठी, म्हणजे 2 सप्टेंबर 2025 पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. या आदेशानुसार, अनमोड घाटमार्गातून अवजड वाहतूक बंद राहणार आहे. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि मालवाहतुकीच्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रस्त्याच्या धोकादायक स्थितीचे तपशील

शुक्रवारी घाटातील एका ठिकाणी भेगा पडल्याचे प्रथम लक्षात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी तात्पुरता काँक्रीट टाकून बॅरिकेड्स लावले आणि एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र शनिवारी पहाटे संपूर्ण माती आणि रस्त्याचा भाग दरीत कोसळला, ज्यामुळे हा मार्ग संपूर्णपणे धोकादायक ठरला आहे.

अवजड वाहतुकीवर दुहेरी मर्यादा

अनमोड घाट हा सध्या कर्नाटक आणि गोवा यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. विशेषतः कुसमळी येथील मलप्रभा नदीवर नवीन पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणीही जड वाहनांवर बंदी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक अनमोड घाट मार्गावरून वळवण्यात आली होती. आता हा रस्ता खचल्यामुळे त्या वाहतुकीवरही पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे.

पर्यटक आणि सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम

या घाटमार्गावरून दररोज हजारो खासगी वाहने, सरकारी बस, तसेच पर्यटकांची वाहने गोवा आणि बेळगाव दरम्यान प्रवास करत असतात. आता या दुर्घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक, पर्यटन आणि व्यापार या सर्व क्षेत्रांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.


Landslide at Anmod Ghat: Heavy Vehicles Banned Till September 2, 2025

A landslide occurred early Saturday morning near Doodhsagar temple on the Anmod Ghat section of the Belagavi-Goa National Highway. The road completely caved in, making it extremely dangerous for traffic. Cracks were first noticed on Friday, and authorities had allowed single-lane movement temporarily. However, after the collapse, the South Goa District Collector has imposed a ban on the movement of all heavy vehicles through Anmod Ghat for the next 60 days, until September 2, 2025.

Motorists have been advised to use alternate routes. Daily commuters, tourist vehicles, and freight transport are likely to be severely impacted by this closure.



Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या