खानापूर
तिओली येथील LIC एजंट पांडुरंग हेब्बाळकर यांचे निधन
खानापूर : तिओली तालुका खानापूर सध्या राहणार हिंदू नगर खानापूर येथील रहिवाशी व विमा प्रतिनिधी श्री.पांडुरंग शांताराम हेब्बाळकर (वय 55) यांचे आज शुक्रवार दिनांक 04 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. आज सायंकाळी पाच वाजता तिवोली येथे त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव, कन्या,भाऊ व वहिनी असा परिवार आहे, ते युवानेते व सामाजिक कार्यकर्ते किशोर हेब्बाळकर यांचे वडील होत.