खानापूरात वटपौर्णिमेच्या दिवशीच वडाचे झाड कोसळले
खानापूर: वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी सात जन्मी हाच नवरा मिळूदे म्हणून वडाची पूजा करतात. पण खानापुरातील जांबोटी क्रॉस जवळ अनेक दिवसापासून उभे असलेले वडाचे झाड नेमक आजचं पडल्याने सर्व जन चक्क झाले आहेत.
हे झाड खानापूर शहरातील खानापूर जांबोटी ( khanapur jamboti) रोडवरील मलप्रभा क्रीडांगणाच्या ( Malaprabha Ground Khanapur) बाजुला गेल्या कित्येक वर्षापासुन आहे . नेमके आज शुक्रवारी दि 21 रोजी वटपौर्णिमेच्या दिवशीच दुपारी मुळासकट जांबोटी रोडवर कोसळले.
पण नशिबाने साथ दिल्याने कुठल्याही सुवासिना ला इजा झाली नाही. सकाळी अनेक सुवासिनींनी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून त्याची पूजा केली होती. पण वडाचे झाड कोसळले तेव्हा झाडाखाली कोणीही पूजा करत नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली.
परंतु रस्तावरून जाणाऱ्या एका दुचाकीवर वडाचे झाड पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे. तर एक जण जखमी झाला आहे. तत्काळ उपस्थित नागरिकांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.
वडाचे जुने झाड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तातडीने वनविभागाला वीजपुरवठा खंडित करून रस्ता मोकळा करण्याची सूचना देण्यात आली. हे झाड हलविण्यास जमलेल्या नागरिकांनी मदत केली.
या घटनेमुळे खानापूर जांबोटी रोड बराच वेळ वाहतुकीसाठी बंद होता. काही वेळाने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
The banyan tree fell on vat purnima day itself.
banyan tree fell on vat purnima day in khanapur
बातम्यांसाठी आमचा ग्रुप नक्की जॉईन करा 👇
https://chat.whatsapp.com/CvQteHKkr0s7BbSvNaiKCD
👇गावच्या बातम्या आणि कोणत्याही जाहिराती देण्यासाठी संपर्क करा:☎️ 8088101547