जांबोटी: कुसमळी नवीन ब्रीजचे उद्घाटन, वाहतूक सुरू
जांबोटी: गेल्या महिनाभरापासून जांबोटी–बेळगांव परिसराचा संपर्क तुटलेला होता, कारण या भागातील ब्रिजचे काम सुरू होते. मोठ्या पावसातसुद्धा स्थानिक कंत्राटदारांनी अथक मेहनतीने हे काम पूर्ण केले असून आज अखेर या ब्रिजचे उद्घाटन झाले आहे.
सध्या या ब्रिजवरून केवळ मोटरसायकल आणि छोट्या चारचाकी गाड्यांची वाहतूक सुरू केली जात आहे. मात्र, हा ब्रिज अद्याप मल्टी-ॲक्सल ट्रक व मोठ्या वाहनांसाठी तयार नाही. ब्रिजच्या साईड भिंतींचे क्युरिंगचे काम अजूनही सुरू आहे आणि काही भागाचे काम प्रलंबित आहे.
त्यामुळे जांबोटी परिसरातील नागरिकांच्या वतीने मोठ्या वाहनचालकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या ब्रिजवरून वाहतूक करू नये. हा ब्रिज फक्त स्थानिक वाहतुकीसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी खुला करण्यात आलेला आहे.
सर्व वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.