खानापूर
थार चालकाचा धोकादायक प्रकार – हालत्री नदीच्या पूरग्रस्त पुलातून गाडी घालून दिली!
खानापूर तालुक्यातील हालत्री नदीला आलेल्या पूरामुळे पुलावरून प्रचंड पाणी वाहत असतानाही एका थार गाडी चालकाने बेजबाबदारपणे गाडी पाण्यातून चालवत नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासनाने सतत सूचना देऊनही अशा प्रकारे जीवाशी खेळणं अत्यंत निषेधार्ह आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित थार चालकावर कायदेशीर कारवाई केली जावी आणि पूरग्रस्त पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलीस प्रशासनाने त्वरित बॅरिकेड्स लावून मार्ग बंद करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
अशा निष्काळजी कृतीमुळे मोठा अपघात घडू शकतो. यामुळं इतर नागरिकही चुकीचा धाडस करू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.