खानापूर – कर्नाटक राज्यातील पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, खानापूर येथील केएलई सोसायटीचे एम. एस. होसमनी पदवीपूर्व विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने 85.49% असा उल्लेखनीय निकाल नोंदवला आहे.
विज्ञान शाखेचा उल्लेखनीय निकाल:
विज्ञान शाखेतील लक्ष्मी एन. पाटील हिने 96% गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे तिने बायोलॉजी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून उत्तुंग यश मिळवले आहे.
द्वितीय क्रमांक अपूर्वा कोडोळी (91.16%) हिने मिळवला असून, तृतीय क्रमांक पवित्रा चौगले (86%) हिने पटकावला आहे. प्रणाली दिनकर मरगाळे (85.33%) आणि मोहम्मद अयान तिगडी (85.33%) यांनी संयुक्तरित्या चौथा क्रमांक मिळवला आहे.

वाणिज्य शाखेतील यशस्वी विद्यार्थी:
वाणिज्य विभागातून निवेदिता एन. पाटील हिने 93.66% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रगती कलाल हिने 91% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर रेश्मा गावडा हिने 86.66% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सुनीता रायप्पागौडर (85.5%) हिने चौथा क्रमांक तर लोरेटा एल. मेनेझेस (82.83%) हिने पाचवा क्रमांक मिळवला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना केएलई कॉलेज एलजीबीचे अध्यक्ष आर. डी. हांजी, एलजीबी सदस्य, प्राचार्य विजय एम. कलमठ आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य विजय एम. कलमठ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.