ज्येष्ठ नागरिक तालुका खानापूर यांची मासिक बैठक संपन्न
खानापुर: सोमवार दिनांक 10जून 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता संघटनेचे अध्यक्ष श्री बनोसी सर यांच्या निरीक्षणाखाली बैठकीला सुरुवात झाली जनरल सेक्रेटरी श्री पवार सरानी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले ऑर्गनाईज सेक्रेटरी श्री एल डी पाटील यांनी मासिक अहवाल आणि मागील ठराव मांडले तसेच महत्त्वाचा प्रस्ताव मांडला संघटनेचा विस्तार वाढल्यामुळे अभिवृद्धीसाठी स्थानिक विभाग करावेत ते असे खानापूर शहर गर्लगुंजी ,पारीश्वाड, लोंढा आणि जांबोटी अशा पाच शाखा निर्माण करून संपर्क व सेवा कार्यकारी संघटन गठीत करणेस सर्वांनी आवाजी मतदानाने प्रस्ताव पारित केला व संघटना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नियोजन करण्याचे ठरविले सभेचे प्रमुख अतिथी श्री थॉमस डिसोजा सेंट झेवियर आयटीआय कॉलेज खानापूर माझी प्रिन्सिपाल यांनी संघटनेबाबत अभिवृधीस सहकार्य व मार्गदर्शन आपल्याकडून असेल असे गौरव उद्गार मांडले अध्यक्षांनी त्रैमासिक नियोजनाबद्दल ठळक मुद्दे मांडले.
1 ऑक्टोंबर मध्ये निसर्गरम्य सहल आयोजित करणे 2 आरोग्य शिबिर संपन्न करणे 3 संघटनेचे सभा भवन व आश्रम आणि संपर्क कार्यालय निर्माण करणे व गरजू व गरजवंतासाठी सेवा देणे सहकार्याच्या विचारांची देवाण-घेवाण करणे उद्देश उद्दिष्ट सफल करणेस एक संघ राहून शांतता शिस्त व सेवा देण्याची कार्य हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे ते आम्ही निर्धाराणे करूया असे आव्हान केले सभेचे संयोजन जॉईन सेक्रेटरी बेनकट्टी सर व खजिनदार जिगजिनी सर यांनी केले.
व्यासपीठावर उपस्थित उपाध्यक्ष भोसले सर मार्गदर्शक रमाकांत सर व हेंबाळकर सर आणि महिला प्रतिनिधी बोर्जीस मॅडम व घाडी मॅडम हे उपस्थित होते योग गुरू कुलकर्णी सर यांनी योगा बाबत माहिती प्राणायाम व योगासने यांचे प्रात्यक्षिक सर्वाकरिता घेतले आणि प्रतिनिधी उमाकांत वाघधरे सरानी आभार प्रदर्शन केले अल्पोपहारणे सभेची सांगता झाली.