खानापूर

बरगाव क्रॉस येथे दुचाकी व टेम्पोचा अपघात; युवक जखमी

खानापूर: काल दुपारी 3:15 वाजता खानापूरजवळील बरगाव क्रॉस येथे दुचाकी आणि पिकअप टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात गोल्याळी येथील एक युवक जखमी झाला. मात्र, अपघातस्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी घाबरून त्याला मदतीचा हात द्यायला टाळले.

या घटनेची माहिती मिळताच श्री राम सेना हिंदुस्तान बरगाव संघटनेचे युवा कार्यकर्ते साई पाटील यांनी पुढाकार घेत जखमी युवकाला मदत केली. त्यानंतर त्यांनी तातडीने ही माहिती खानापूर पोलीस स्टेशनला कळवली. पोलीस आणि रुग्णवाहिकेला कळवण्यात आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ अॅम्ब्युलन्स पाठवली आणि जखमी युवकाला खानापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या जखमी युवकाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते