खानापूर

खानापुरात 23 फेब्रुवारीला मराठी प्रतिष्ठानची सामान्यज्ञान परीक्षा

खानापूर: मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचे यंदा 23 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले आहे.

ही परीक्षा प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांसाठी होणार असून, मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल येथे सकाळी 10.30 वाजता सुरुवात होईल. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि त्यांचे गुण विकसित व्हावेत, यासाठी गेल्या 10 वर्षांपासून या परीक्षेचे आयोजन केले जात आहे.

परीक्षेचे स्वरूप लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या धर्तीवर असून, बहुपर्यायी प्रश्न आणि ओएमआर उत्तर पत्रिकेद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

प्राथमिक गटासाठी: ₹3500, ₹2500, ₹2000, ₹1500, ₹1000, ₹800, ₹700

माध्यमिक गटासाठी: ₹4000, ₹3000, ₹2500, ₹2000, ₹1500, ₹1200, ₹1000 अशी पारितोषिके असतील.

विद्यार्थ्यांनी नावनोंदणी शुक्रवार, 21 फेब्रुवारीपर्यंत दै. पुढारी कार्यालय, वाझ बिल्डिंग, दुसरा मजला, मिनी विधानसौधसमोर, खानापूर येथे करावी. अधिक माहितीसाठी नारायण कापोलकर (9449582080), वासुदेव चौगुले (9901070234) किंवा ईश्वर बोबाटे (9945384531) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते